गरिबी आणि त्यातही एखादा जर slum भागातून आला असेल तर त्याच्याकडे बघण्याचा जो उद्देश असतो तो फार काही चांगला नसतो. आयुष्यात काय होईल ह्याची जाणीव सुद्धा काहींना नसते. परंतु राखेतून जसा फिनिक्स पक्षी उडी घेऊन उंच भरारी मारतो तशीच काही व्यक्तिमत्व असतात. शाळेमध्ये उनाडक्या करणारा बारावी नापास मुलगा आज पुण्यामध्ये एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक होण्याची मुहूर्तमेढ रोवतोय आणि तो युवक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचे नाव आहे श्री दिनेश मांगले हिंदवी ग्रुप चे सर्वेसर्वा मराठवाड्याच्या एका बॉर्डर वरील ग्रामीण भागातून दिनेशजी पुण्या सारख्या ठिकाणी येतात आले त्यांनी आपले बालपण लक्ष्मी नगर सारख्या slum भागात घालवले. शिक्षणाच्या आईचा घो म्हणत पहिली ते अकरावी जेमतेम काठावर पास आणि बारावी तर फेल. पण तरीही हिम्मत ना हरता कसाबसा डिप्लोमा ला प्रवेश मिळवला… दिनेशजी बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर agent ते बिल्डर आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आणि हिमतीवर हिंदवी ग्रुप ची स्थापना करून हजारो लोकांचे घराचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास घेणारा आणि तेही अगदी कमी वेळात. अशा धडाडीच्या युवकाचा सन्मान करताना आम्हाला अभिमान आहे.